पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तत्त्वमसि

एखाद्या प्रगत संस्कृतीला तुम्ही कुठल्या परिमाणांवर तोलता असा प्रश्न कुणी तुम्हाला केला तर काय उत्तर द्याल? कदाचित तुमच्या सभोवतालची परिस्थिती पाहून आणि ती तुमच्या मनाला पटणारी असल्याने त्यावरून भाष्य कराल. भौतिक निकष लावून उत्तर द्याल. कदाचित तुमच्या मान्यतेविरुद्ध जगणाऱ्या समूहाला असंस्कृत मानून त्यांना सुधारण्याचे काम कराल. त्यांचा उत्कर्ष करून त्यांना तुमच्यासारखं 'प्रगल्भ' बनवण्याचा कळकळीने प्रयत्न कराल. कराल ना? पण समजा त्या तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हालाच अवचित स्वतः बद्दल प्रश्न पडायला लागले तर? आजवर गोळा केलेल्या ज्ञानाच्या सत्यासत्यतेबद्दल उलट तुमचंच चिंतन घडायला लागलं तर? तुम्ही मनात धरून चाललेल्या प्रमेयांच्या पायवाटेवर अचानक विरुद्ध दिशेने तुमचा प्रवास सुरु झाला तर? ह्या विचारांच्या गाभ्यावर ध्रुव भट्ट लिखित 'तत्त्वमसि' ह्या पुस्तकाचा प्रवास घडतो. मुळात एका प्रवासाची गोष्ट असलेले हे पुस्तक वाचकाला बोटाला धरून एका आत्मशोधाच्या यात्रेला नेते. पुस्तक अतिशय सध्या सोप्या सरळ भाषेत लिहिलेलं आहे. जडशीळ शब्द वापरून, वाचकाला त्याच्या ओझ्याखाली दाबून टाकत नाही. कुठ...