तत्त्वमसि
एखाद्या प्रगत संस्कृतीला तुम्ही कुठल्या परिमाणांवर तोलता असा प्रश्न कुणी तुम्हाला केला तर काय उत्तर द्याल? कदाचित तुमच्या सभोवतालची परिस्थिती पाहून आणि ती तुमच्या मनाला पटणारी असल्याने त्यावरून भाष्य कराल. भौतिक निकष लावून उत्तर द्याल. कदाचित तुमच्या मान्यतेविरुद्ध जगणाऱ्या समूहाला असंस्कृत मानून त्यांना सुधारण्याचे काम कराल. त्यांचा उत्कर्ष करून त्यांना तुमच्यासारखं 'प्रगल्भ' बनवण्याचा कळकळीने प्रयत्न कराल. कराल ना? पण समजा त्या तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हालाच अवचित स्वतः बद्दल प्रश्न पडायला लागले तर? आजवर गोळा केलेल्या ज्ञानाच्या सत्यासत्यतेबद्दल उलट तुमचंच चिंतन घडायला लागलं तर? तुम्ही मनात धरून चाललेल्या प्रमेयांच्या पायवाटेवर अचानक विरुद्ध दिशेने तुमचा प्रवास सुरु झाला तर?
ह्या विचारांच्या गाभ्यावर ध्रुव भट्ट लिखित 'तत्त्वमसि' ह्या पुस्तकाचा प्रवास घडतो. मुळात एका प्रवासाची गोष्ट असलेले हे पुस्तक वाचकाला बोटाला धरून एका आत्मशोधाच्या यात्रेला नेते. पुस्तक अतिशय सध्या सोप्या सरळ भाषेत लिहिलेलं आहे. जडशीळ शब्द वापरून, वाचकाला त्याच्या ओझ्याखाली दाबून टाकत नाही. कुठल्याही प्रकारचा न्यायनिवाडा हे पुस्तक करत नाही. ते वाचकाला विचार प्रवर्तन करायला भाग पाडतं, किंबुहना ह्याच मुळे ही एक उत्कृष्ट कलाकृती ठरते. ह्या प्रवासाच्या शेवटी हाती काय लागलं ह्याचा जमाखर्च प्रत्येक वाचकाने स्वतः करायचा आहे. येणारं उत्तर सगळ्यांसाठी सारखं नसेल, पण त्याने ह्या अभूतपूर्व प्रवासाचे महत्त्व तिळभरही कमी होत नाही.
पुस्तकाला धार्मिक बैठक नाही, राजकीय तर त्याहून नाही, त्यामुळे वाचणार्याने हे पुस्तक कोऱ्या मनाने, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता वाचावं ही अपेक्षा आहे. मूळचे गुजराती भाषेतले हे अतिशय नावाजलेले आणि पुरस्कृत पुस्तक मराठी इंग्लिश सहित निरनिराळ्या भाषांमधून भाषांतरीत झालेलं आहे.
मूळचा भारतीय असलेला कथानायक 'तो' १८ वर्षे अमेरिकेत काढून, त्याच्या प्रोफेसरांच्या सल्ल्यानुसार मध्य भारतात नर्मदा नदीतील खोऱ्यांमध्ये आदिवासी केंद्रात शाळा उघडायला येतो. 'मानव संसाधन' ह्या क्षेत्रात भरपूर संशोधन केलेल्या त्याला भारतात पाय ठेवल्या ठेवल्या सांस्कृतिक आणि वैचारिक धक्के लागायला लागतात. आजवर शिकलेल्या त्याच्या सगळ्या प्रमेयांना धुडकावून लावत आयुष्य कंठणारे लोक पाहून तो चक्रावतो. ट्रेन मधून नदी दिसताच 'नर्मदे हर' म्हणत तिच्यात पैसे टाकायला धडपडणारे प्रवासी, समोरच्या सीटवर बसलेली आणि त्याला 'नर्मदा मा तारी रक्षा करसे बेटा' असं म्हणून आशीर्वाद देणारी अनोळखी बा, तिच्या बाजूला शांतपणे नमाज पढणारा नमाजी आणि काहीही ओळख नसताना एकमेकांचे डबे वाटून खाणारी आणि सलगीने वागणारी ही लोकं नक्की कुठल्या शतकात राहतात ह्याचा विचार करत 'तो' त्याच्या इप्सित स्थळी पोचतो आणि त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळते. असं काय ह्या देशात, इथल्या लोकांत आहे ज्याने ही संस्कृती हजारो वर्षे टिकून राहिली, बहरली ह्याचा छडा लावायचा तो निश्चय करतो.
त्याच्या ह्या प्रवासात आपल्याला कोण कोण भेटतं? उच्चशिक्षित पण ध्येयाने पछाडलेली आदिवासी विकास केंद्र चालवणारी सुप्रिया भेटते, बित्तुबंगा भेटतात, गणेश शास्त्री भेटतात, दुर्गम ठिकाणी शाळा चालवणारे शिक्षक भेटतात, असंख्य आदिवासी भेटतात. ह्या सगळ्यांच्या गोष्टीमार्फत वाचकाला निरनिराळे अर्थबोध होत जातात. तसं पाहिलं तर ह्या सुरम्य गोष्टीत काहीच घडत नाही, पण कथा संपते तेव्हा ती वाचणाऱ्याला एका वेगळ्या पटलावर घेऊन जाते. काहीतरी तरल, मनाला शांतवणारं घडल्याची अनुभूती देते.

नर्मदेच्या खोऱ्यात राहणारी आणि तिला जीवनदायिनी माता समजणारी ही संस्कृती आहे. पर्यावरणाशी समतोल राखत, भौतिक अर्थाने गरीब पण उन्मुक्त, निरलस आयुष्य जगणारी ही जमात त्याला अंतर्मुख करते. आणि आयुष्यात प्रथमच सुख आणि आनंद ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ह्याचं त्याला आकलन होतं. त्याने आजवर जपलेल्या सिद्धांतांना तडे पडायला लागतात, ते सिद्धांत खरे मानायचे की हे भोळेभाबडे लोक जसे जगतात त्याला खरं मानायचं? मधमाशी पालन करण्याच्या उद्योगात त्या मारल्या जात असतील तर हे असे उद्योग इथे उभारू देणार नाही असे म्हणणारे फाटके आदिवासी, रस्त्यात चालताना, तुमचं ओझं सहज उचलून घेत सोबत करणारे आदिवासी, पोटात भुकेचा डोंब उसळला असताना मिळालेल्या अर्ध्या भाकरितला तुकडा रस्त्यात कोणी दुसरा भुकेला मिळाला तर देता यावं म्हणून पानात बांधून घेणारे लोक, घरात अन्नाचा दाणा नसताना घरावरून जाणाऱ्या पांथस्थाना 'खाली पेट नही जाने दू' असं म्हणत हातावर मिठाचा खडा ठेवणारा म्हातारा, आणि हा मिठाचा खडा खाल्ल्यावर आता दुसरीकडे अजून काही खाल्लं तर त्या म्हाताऱ्याची साधना निष्फळ होईल म्हणून उपाशी राहणारा वेडा फकीर - हे सगळे खरे की माणसाला, निसर्गाला आणि जनावरांना फक्त संसाधन म्हणून वापरणारे 'त्या'च्या जगातले सिद्धांत खरे? एकुलत्या एका भावाचा घास घेतलेला नरभक्षक वाघ जेव्हा सापळ्यात सापडतो, तेव्हा ती मादा आहे हे लक्षात येऊन तिची पिल्लं एकटी असतील ह्या विचाराने तिला सापळ्यातून सोडून देणाऱ्या माणसाला तुम्ही असंस्कृत म्हणाल? दर पौर्णिमेला न चुकता कर्जाचं व्याज चुकवायला, थंडी वाऱ्यातून मैलोनगणती पायपीट करून मूठभर ज्वारी, फळे, मध सावकाराकडे देऊन कर्जमुक्त होणाऱ्या ह्या लोकांना तुम्ही अडाणी मानाल? ह्या लोकांच्या माध्यमातून त्याला कळत जाते की नर्मदेच्या पाण्याने ह्या संस्कृतीमध्ये आजही काहीतरी सळसळते, लसलसते जिवंत ठेवलंय, जे इतक्या शतकांच्या मानसिक, बौद्धिक आणि भौगोलिक आक्रमणानंतरही अजून अनाहत आहे. ते पिढ्यांपिढ्या तसच पुढे पोचवल्या जातं.
रानात भटकत असताना एकदा सुप्रिया त्याला विचारते, 'जगात जर एखादी प्राण्यांची, वनस्पतीची जात लोप पावायला लागली तर सगळीकडे ओरड उठते, प्रदर्शने होतात. मग आज एका हजारो वर्षे जुन्या संस्कृतीच्या मुळावर घाव घातल्या जातो आहे, त्यांना नामशेष करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याबद्दल विरोधप्रदर्शने का होत नाहीत? त्याला परिवर्तन हे नाव का दिल्या जातं?' तो निरुत्तर होतो. आश्रमात परिक्रमावासी येतात, वेगवेगळ्या स्वभावाचे, आर्थिक स्तरातले, 'ह्या असल्या लोकांची सेवा करतेस तू?' तो काहीश्या तिरस्काराने विचारतो. 'ही सेवा परिक्रमावासींची नाही, परिक्रमेच्या परंपरेची आहे, तिचं स्पष्ट उत्तर येतं. 'जी परंपरा हजारो वर्षे जपली तिला खंड पडायला नको म्हणून आहे'. व्यास मुनी आले तर त्यांना बसायला केलेला एक बाक बघून त्याला हसायला येतं. 'ते येणार आहेत असं वाटतं तुला?' 'ते चिरंजीवी आहेत ह्या भावनेचे हे प्रतीक आहे, ते आले काय किंवा नाही ह्याने काय फरक पडतो? इथे त्यांची बसायची सोय केली आणि त्यांच्या असण्यावर हजारो वर्षे श्रद्धा ठेवली आहे हा भाव जास्त महत्वाचा नाही का?'
धर्म आणि श्रद्धा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. गणेश शास्त्री सांगतात, 'धर्मावर श्रद्धा नसली तर चालेल, पण श्रद्धा असायला हवी'. ह्या वाक्यातील अर्थ ज्याला आकळला त्याला ही भारतीय संस्कृती समजली. थोडसं विषयापासून दूर गेलं तर एक उदाहरण मनात येतं. कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली तेव्हा एक दिवस एकाच वेळी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या असं ठरवलं. त्यावेळी एका भिकाऱ्याचा टाळ्या वाजवतानाचा विडिओ प्रसिद्ध झाला होता. जर्जर अवस्थेतील तो भिकारी जवळ फुटकी कवडी नसताना आनंदी होऊन टाळ्या वाजवत होता, त्याला धर्माशी काहिही सोयरसुतक नव्हतं, पण कुठल्याश्या अनामिक श्रद्धेने भारून जाऊन, भान विसरून त्या टाळ्या वाजवत होता. आनंदाने ओसंडून वाहत होता. त्याने असं का केलं हे ज्याला कळलं त्याला हा इथल्या प्रत्येक मनुष्यात मूलभूत असणारा आध्यत्मिक पाया दिसून येईल. 'वसुधैव कुटुंबकम्' ह्या उक्तीप्रमाणे जगणारे लोक इथे ठायी ठायी वसले आहेत हे समजेल. नदीला माता का मानतात हे उमजेल. ही लोकं एकमेकांशी कुटुंब भावनेच्या नाजूक पण लवचिक तंतूने बांधल्या गेली आहेत हे कळेल.
अश्या तर्हेने त्याचा ,'नदी रक्षण करते? ती तर बुडवते' इथून सुरू झालेला प्रवास नर्मदेतीरी उभे राहून 'नर्मदे हर' हा जयघोष करण्यापर्यंत होतो. परिक्रमा वासींना कधीतरी अवचित नर्मदा मनुष्यरूपात भेटायला येते अशी आख्यायिका आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात मनातल्या मनात घातलेल्या त्याच्या परिक्रमेत त्याला ही 'रेवा' भेटेल का? तिची सदेह भेट होणे गरजेचे आहे का? की तिने मुळाशी रुजवलेलं 'नर्मदापण' पुरेसं आहे? मनुष्याच सर्वस्व हरण करून पुन्हा ते नव्याने बहाल करणारी नर्मदा नक्की कोण आहे? 'हर हर गंगे, नर्मदे हर' ही निव्वळ नद्यांना घातलेली साद आहे का? की त्यांच्या तटावर वसलेल्या, हजारो वर्षे टिकून समृद्ध झालेल्या एका प्रगल्भ सभ्यतेला केलेलं हे वंदन आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शेवटी वाचकाने स्वतः सोडवायची आहेत. 'अहं ब्रह्मस्मि' पासून सुरू होऊन 'तत्त्वमसि' पर्यंतचा हा मनोवेधक प्रवास जरूर करा आणि स्वतःला पुन्हा एकदा भेटा.
नर्मदे हर !

टू गुड, फारच मार्मिक विश्लेषण, पुस्तक वाचण्याची इच्छा झाली।
उत्तर द्याहटवा🙏 नक्की वाच! Next should be सागरतीरी by same author..Very soothing books..
हटवा