पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणीतली गाणी

आठवणीतल्या गाण्यांची एक गम्मत आहे. आवडत्या गाण्यांपेक्षा वेगळी! आवडीची गाणी आपण निव्वळ ती आवडतात म्हणून ऐकतो. चव घेत, सावकाश..एखाद्या गाण्याची गायकी भुरळ पाडते, एखाद्याचे शब्द तर एखाद्याचं संगीत! पण आठवणीतल्या गाण्यांचं तसं मुळीच नाही. अश्या गाण्यांशी कित्येक प्रसंग, माणसं जोडलेली असतात. आयुष्यभर आपण मग त्या गाण्याचा त्या माणसांशी आणि प्रसंगांशी संबंध लावत राहतो. ही गाणी मी कित्येकदा नुसत्या त्या गाण्यांशी संलग्न आठवणी उजळता याव्यात म्हणून ऐकते. ह्या गाण्यांचं एक बरं असतं. ती कायम मनात खोल कुठेतरी वाजत राहतात. आठवली की दृष्टीआड आणि स्मृतिआड गेलेली माणसं अवचित परत भेटतात. विसरलेली ठिकाणे परत जशीच्या तशी दिसू लागतात. ती ऐकत असताना गतायुष्याचा एखादा हरवलेला तुकडा अचानक हाती लागतो आणि कधी कधी मनाला जाणवणारी अपूर्णता काहीशी कमी होते. मी ७/८ वर्षाची असतानाची वेळ असेल. तेव्हा गालगुंडाची (mumps) साथ आली होती आणि माझ्यासकट माझे कित्येक मित्र मैत्रिणी ह्यात धारातीर्थी पडले होते. तापाने फणफणलेल्या अवस्थेत बाबांनी मला गाणी ऐकवायला सुरुवात केली आणि तेव्हा ऐकलेल्या काही गाण्यांच्या जोरावर मी आजता...