पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ती गेली तेव्हा...

हे असं कधीतरी होणार हे माहित होत. ही वेळ आता लवकर येइल हे ही कळत होत तरी तो विचार त्या त्या वेळी किती जीवघेणा वाटत असे. लता नसेल तेव्हा?? हा प्रश्न कितीदातरी मनात यायचा. धास्तावलेलं मन मग 'पण ती आहे ना? पुढचं पुढे' अशी तोकडी समजूत घालायचे. लहानपणापासून तिचा माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो ह्याचं मला कोण कौतुक वाटत असे! नुसत्या त्या एका गोष्टीवर मी स्वत:ला सेलिब्रिटी समजायला लागले होते. लता विरुद्ध आशा ह्या वादामध्ये तेव्हा मी हिरीरीने लताचा पक्ष घेत होते..आशाताई पण प्रचंड आवडत असून सुद्धा! लतादीदी आणी माझं एक स्पेशल नाते मनात ठाण मांडून बसले होते. माझ्या आजीच्या पिढीला तिने त्यांच्या उमेदीच्या वर्षात साथ दिली आणी माझ्या आईच्या आणी माझ्या पिढीला घडवलं. ह्या एका गोष्टीवरून तिच्या प्रतिभेची व्याप्ती लक्षात यावी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत मीराबाई हे सगळे ह्या दोन पिढ्यांना मंगेशकर घराण्यामुळे आकळले. घनश्याम सुंदरा ह्या भूपाळीने अगणित वेळा उठवलंय. निळ्या पहाटवाऱ्यात तिच्या स्वर्गीय आवाजाने जागृत होणारं घर आजही आठवतं. सन्ध्याकाळी दिवे लागणीला ऐकलेल्या पसायदानाने भ...