पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कौसल्येचा राम

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम। भाबड्या ह्या भक्तासाठी देव करी काम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।। माणिक वर्मा ह्यानि गायलेलं आणि माझ्या आवडत्या  पु. लं नी संगीतबद्ध केलेलं हे गीत. हे माझ्या आजीचंही आवडीचं गीत म्हणून जास्त लक्षात आहे!  आजीचा आवाज सुरेल, त्याला भरपूर चढ होता. तिला गाण्याची प्रचंड आवड. पण त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तिला जेमतेम गोल साडी नेसून कॉलेज ला इंटर पर्यंत शिकण्याची काय ती मुभा मिळाली होती. गाणं शिकणं तर दूरची गोष्ट. नाही म्हणायला आजीचे माहेरी भरपूर लाड झाले. माझे पणजोबा म्हणजे डहाणू चे अण्णा चौबळ. पुढे मुंबईला येऊन स्थिरावले. चार मुलांनंतर आजी पहिली मुलगी, त्यामुळे तिच्यावर अण्णा आजोबांचा विशेष जीव! तिला एकटीलाच फक्त रोज चांगलं तांब्याभर धारोष्ण दूध प्यायला मिळायचं म्हणे. तिला घरातले सगळे जण ताई म्हणत. तेव्हाच्या परिस्थितीत मुंबईत देखील मुली परकर पोलक्यातून सरळ नऊवारीत प्रवेश करायच्या आणि संसाराला लागायच्या. पण अण्णा आजोबांनी आजीला आवर्जून एस.एन. डी. टी कॉलेजात घातलं. त्यावेळी तिचे मोठे भाऊ तिला लुगडं नेसून कॉलेज ला जायला लावायचे. चक...