पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुझे गीत गाण्यासाठी....

इमेज
लहानपणी माझ्याकडे एक रांगोळीचं पुस्तक होतं. ठिपक्यान्च्या रांगोळ्या असलेलं. पुस्तकाच्या कव्हर वर आई आणी तिच्या दोन मुलांचे चित्र होतं. भर पहाटे उठून अभ्यंगस्नान करून रांगोळी काढणारे मायलेक. येऊ घातलेली दिवाळीची पहाट सुचवणाऱ्या तांबड्या निळसर रंगाच्या पार्श्वभूमीवर असलेलं हे मुखपृष्ठ मला खूप आवडायचं.  रात्रभर लुकलूक करून थकलेल्या चांदण्यांचा पडदा बाजूला सारून आकाशात अलगद अवतारणारी रंगीबेरंगी, उत्सुकतेची ती पहाट मी अजूनही शोधते आहे. शांत स्तब्ध आसमंतात असे निळे गुलाबी वारे कधी कुठे सुटत असतील का? आकाशाचं आणि माझं नातं घट्ट करण्यात ह्या लहानश्या पुस्तकाचा मोठा हातभार आहे. मला जवळून ओळखणाऱ्या सगळ्यांना माझं आभाळप्रेम ठाऊक आहे. शहरातल्या गलबलाटात कुठूनतरी दिसणारा आभाळाचा लहानसा तुकडापण मला पुरतो. संध्याकाळी रपेट मारायला गेलं की आता नेहमी भेटणारे लोक देखील जरा बिचकून चालतात. वर आकाशात बघून समोर चालणारी ही वेडगळ बाई चुकून धडकायला नको म्हणून. तासंतास निरखलं तरी दररोज नव्याने भेटणारे हे आकाश मला दिसत तसं सगळ्यांना दिसत असेल का? मला रोज नव्याने भुरळ घालणारे हे आकाश इतरांच्या मनात अशीच भावन...

चुनरी संभाल गोरी....

हा लेख खास ओढण्यांसाठी.. गेले दीड दशक नामशेष झालेल्या माझ्या प्रियसखी 'ओढणी'साठी! अचानक लुप्त झालेली ही मैत्रीण आता पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात अवतीर्ण होते आहे हे निमित्त साधून काही जुन्या आठवणीना उजाळा म्हणून घातलेला हा लेखनचा घाट! ओढणीचा माझ्या आयुष्यात फॉर्मल प्रवेश अर्थात मोठ्या बहिणींमुळे झाला. मला लहानपणापासून ह्या ओढण्यांच खूप अप्रूप होतं. वेगवेगळ्या रंगातल्या, कधी कलाकुसर केलेल्या ओढण्या लपेटलेल्या सगळ्या मोठ्या बहिणी म्हणजे माझ्यासाठी हिरोईन पेक्षा कमी नव्हत्या. कधी एकदा मोठी होऊन अश्या मस्त झोकदार ओढण्या घेऊन फिरेन असं झालं होतं मला. मग कधीतरी ताईच्या ड्रेसवरची ओढणी फ्रॉक वर लावून गिरक्या घेऊन बघणे, कधी डोक्यावरून घेऊन आरश्यासमोर मिरवणे असं करता करता कधीतरी माझ्यासाठी पहिला ओढणीवाला ड्रेस शिवला आणि काय विचारता... चांगल्या अर्ध्या डझन सेफ्टी पिना इकडे तिकडे खोचून ऐटीत माझं पार्सल घराबाहेर पडलं आणि त्या दिवसापासून ओढणी माझी घट्ट आणि जवळची मैत्रीण झाली. ऐशी-नव्वद च्या दशकात बहुतेकींची होती तशीच..बालपणातून तारुण्यात प्रवेश करताना मिळालेली एक जिवलग सखी!  एखाद्या वस्त्राने...

खूणगाठी

गेले काही महिने मी एका वेगळ्या मनस्थितीतून जात होते. भरपूर वाचन, थोडंसं अध्यात्म आणि आत्मचिंतन असा वेगळा प्रवास सुरु होता. विचारान्चा कल्लोळ माजला होता. त्याचा परिणाम असा झाला की माझे शब्दच थबकले. नियमित लेखन करण्याची आवड असताना असं एकदम अडखळलं की काय होतं त्याचा अनुभव पहिल्यांदा आला. डोक्याची अवस्था पार एखाद्या गजबजलेल्या यात्रेसारखी झाली होती. आणि त्या जत्रेचा exit अचानक बंद झाल्यामुळे आत अडकलेल्या  सगळ्या विचाररूपी यात्रेकरुंची कोंडी झाली होती. सगळे विचार बिचारे जागा मिळेल तिथे अंग चोरून बसून होते. दार कधी उघडतंय ह्याची वाट बघत. सांगण्यासारखं खूप काही असताना वाचा गेल्यावर होईल तशी घुसमटलेली अवस्था झाली होती. गेल्या आठवड्यात एका लग्नाला जाणं झालं आणि तिकडे सगळ्या जिवलग बहिणी व वहिन्या कित्येक वर्षांनी भेटल्या. बहुतेक सगळ्यांचा 'तू खूप दिवसात काहीही लिहिलं नाहीस, परत लिखाण सुरु कर आणि आम्हांला सगळ्याची लिंक दे,' असा तक्रारीचा सूर लागला होता. त्यान्ची प्रेमळ अपेक्षा बघून आधीच गजबजलेले डोकं जरा अजून भाम्बावलं. पण त्या सगळ्याना भेटून कुठेतरी डिस्चार्ज झालेली बॅटरी हळूहळू चार्ज व...