पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खूणगाठी

गेले काही महिने मी एका वेगळ्या मनस्थितीतून जात होते. भरपूर वाचन, थोडंसं अध्यात्म आणि आत्मचिंतन असा वेगळा प्रवास सुरु होता. विचारान्चा कल्लोळ माजला होता. त्याचा परिणाम असा झाला की माझे शब्दच थबकले. नियमित लेखन करण्याची आवड असताना असं एकदम अडखळलं की काय होतं त्याचा अनुभव पहिल्यांदा आला. डोक्याची अवस्था पार एखाद्या गजबजलेल्या यात्रेसारखी झाली होती. आणि त्या जत्रेचा exit अचानक बंद झाल्यामुळे आत अडकलेल्या  सगळ्या विचाररूपी यात्रेकरुंची कोंडी झाली होती. सगळे विचार बिचारे जागा मिळेल तिथे अंग चोरून बसून होते. दार कधी उघडतंय ह्याची वाट बघत. सांगण्यासारखं खूप काही असताना वाचा गेल्यावर होईल तशी घुसमटलेली अवस्था झाली होती. गेल्या आठवड्यात एका लग्नाला जाणं झालं आणि तिकडे सगळ्या जिवलग बहिणी व वहिन्या कित्येक वर्षांनी भेटल्या. बहुतेक सगळ्यांचा 'तू खूप दिवसात काहीही लिहिलं नाहीस, परत लिखाण सुरु कर आणि आम्हांला सगळ्याची लिंक दे,' असा तक्रारीचा सूर लागला होता. त्यान्ची प्रेमळ अपेक्षा बघून आधीच गजबजलेले डोकं जरा अजून भाम्बावलं. पण त्या सगळ्याना भेटून कुठेतरी डिस्चार्ज झालेली बॅटरी हळूहळू चार्ज व...