पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राम आयेंगे!

गेल्या महिन्याभरापासून गळ्याशी आलेला आवंढा सुटता सुटत नाहीये. इतकं की तो ताण दिवसातून कितीतरी वेळा डोक्याच्या शिरा आवळून टाकतो. वाचता वाचता डोळे भरून वाहायला लागतात. टी व्ही बघता बघता दाटून येतं. मनात कुठेतरी खूप वर्ष थोपवून ठेवलेला बांध ढासळून आता ते थबकलेलं पाणी भरभरून वाहतंय. मुळात तो बांध मनात कुठे, कसा, कधी उभा झाला ह्याचीच कल्पना नव्हती. मात्र आता त्यातून उसळणारं पाणी लपवायची धडपड निष्फळ ठरते आहे. कित्येक विचार आहेत, मनात गर्दी करून. त्यांची सुसंगत मांडणी कठीण आहे. खूप बोलायचंय पण शब्द खुंटलेत. त्यातले काही निसटलेले शब्द मधेच डोळ्यावाटे बाहेर पडतात. तस म्हटलं तर राम माझ्या आयुष्यात असून सुद्धा नव्हता. त्याची पूजा उघडपणे मांडायची सर्वसामान्यांना मुभा होतीच कुठे? तसा प्रयत्न केला तर कधी त्याच्या साध्या भोळ्या भक्तांना अतिरेकी ठरवलं गेलं, तर कधी मूढ, मागासलेले म्हणून त्यांची अवहेलना झाली. राजकारणाच्या कोलाहलात एकीकडे त्याचं देवपण हिरावून घेतलं आणि दुसरीकडे त्याच्या भक्तांची भक्ती कायम प्रश्नांकित ठेवली गेली. त्याचं 'रामत्व' कोर्टकचेर्यांच्या बासनात गुंडाळून ठेवल्या गेलं. क...