पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणीतली गाणी

आठवणीतल्या गाण्यांची एक गम्मत आहे. आवडत्या गाण्यांपेक्षा वेगळी! आवडीची गाणी आपण निव्वळ ती आवडतात म्हणून ऐकतो. चव घेत, सावकाश..एखाद्या गाण्याची गायकी भुरळ पाडते, एखाद्याचे शब्द तर एखाद्याचं संगीत! पण आठवणीतल्या गाण्यांचं तसं मुळीच नाही. अश्या गाण्यांशी कित्येक प्रसंग, माणसं जोडलेली असतात. आयुष्यभर आपण मग त्या गाण्याचा त्या माणसांशी आणि प्रसंगांशी संबंध लावत राहतो. ही गाणी मी कित्येकदा नुसत्या त्या गाण्यांशी संलग्न आठवणी उजळता याव्यात म्हणून ऐकते. ह्या गाण्यांचं एक बरं असतं. ती कायम मनात खोल कुठेतरी वाजत राहतात. आठवली की दृष्टीआड आणि स्मृतिआड गेलेली माणसं अवचित परत भेटतात. विसरलेली ठिकाणे परत जशीच्या तशी दिसू लागतात. ती ऐकत असताना गतायुष्याचा एखादा हरवलेला तुकडा अचानक हाती लागतो आणि कधी कधी मनाला जाणवणारी अपूर्णता काहीशी कमी होते. मी ७/८ वर्षाची असतानाची वेळ असेल. तेव्हा गालगुंडाची (mumps) साथ आली होती आणि माझ्यासकट माझे कित्येक मित्र मैत्रिणी ह्यात धारातीर्थी पडले होते. तापाने फणफणलेल्या अवस्थेत बाबांनी मला गाणी ऐकवायला सुरुवात केली आणि तेव्हा ऐकलेल्या काही गाण्यांच्या जोरावर मी आजता...

वाऱ्यावरती गन्ध पसरला..

आठवणींचा संबंध थेट आपल्या पाच इंद्रियांशी जोडल्या गेलाय. रस, रूप, गन्ध, स्पर्श, शब्द ह्या पाच इंद्रियांतून डोकावणाऱ्या जाणिवांचा संबंध थेट मनाशी आणि मनात खोल लपलेल्या आठवणीत असतो. म्हणून एखादं जुनं गाणं ऐकलं की हुरहूर लागते किंवा एखादा जुना फोटो पाहिला की मन प्रसन्न होतं आणि एखादा ओळखीचा गन्ध हव्याहव्याशा आठवणींच्या गावात घेऊन जातो. खूप आधी कधीतरी ह्या विषयावर लिहायला सुरुवात केली होती, ते लिखाण तसच कुठेतरी अर्धवट पडून होतं. मग एका मैत्रिणीने तिच्या अमेरिकेतल्या घरचे जाईच्या फुलांचे फोटो पाठवले आणि म्हणाली, ह्याचा सुवास मला आमच्या जुन्या घराच्या अंगणात घेऊन जातो, सगळ्या आठवणी गर्दी करून येतात. मी मनात म्हटलं ,'खरच की, अगदी ह्याच आठवणींच्या ओढीने आपण काही बाही खरडायला बसलो होतो, ते राहून गेलं, पूर्ण केलंच पाहिजे'. असं ठरवून सरसावून नेटाने लिहायला बसले आणि.....  नेमका मला कोरोना झाला. बाकी त्रास कमी असले तरी, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे, वास घेण्याची हळूहळू मंदावत गेलेली क्षमता. (आणि ती टिकून राहावी म्हणून माझी चाललेली धडपड). शेवटी कधीतरी ती 'वास घे...

पत्रास कारण की....

'तुला यातलं काय हवं ते घे'..आईने माझ्यासमोर लहानसा खजिना मांडून ठेवला होता..'तुला आलेली पत्रं आहेत ही'..समोर मांडलेल्या लहान मोठ्या कागदांकडे मी हरखून पहात होते. लहान पिवळ्या एन्व्हलप मधे भरलेलं एक पत्र, निळ्या इनलँड लेटर वर लिहिलेलं दुसरं..पोस्टकार्ड भरून लिहिलेलं अजून एक. माझ्या दहावी बारावीच्या परिक्षेआधी अभिष्टचिंतन करण्यासाठी आणि निकाल लागल्यानंतर अभिनंदन देण्यासाठी लिहिलेली पत्र! माझ्या नावाने आलेली सर्वात पहिली पत्र असल्याने आईने जपून ठेवली होती. मी अलगद एक कागद उचलला. वहीच्या पानावर लिहिलेला मजकूर, त्याची शैली आणि थोडंस लांब वळणदार अक्षर मला कुठूनही ओळखता आलं असतं. एकदम गलबलून आलं..अप्पासाहेब! माझे आजोबा, आईचे वडील..पत्रव्यवहार हा शब्द कसा प्रचलित झाला असेल, ते अप्पासाहेबांकडे बघून समजायचे. सामाजिक, कौटुंबिक बांधीलकीचा तो एक नियम आहे, म्हणून कदाचित व्यवहार हा शब्द पत्राबरोबर जोडत असतील. अप्पासाहेब पत्रव्यवहारात अतिशय चोख होते. नातेवाईकांना, मित्रमंडळींना किंवा कुठल्या कामानिमित्त वेगवेगळ्या कचेरीत लिहिलेल्या पत्रांची त्यांच्याकडे नोंद असायची. कोणाकडे शुभ प्रसंग...